Wednesday, 24 August 2016

सुंदरा मनामध्ये भरली - राम जोशी

सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली..
हवेलीत शिरली, मोत्याचा भांग…।। २ ।।
अरे गड्या, हौस नाही पुरली
म्हणोनि विरली, पुन्हा नाही फिरली
कुणाची सांग …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || धृ ||

जशी कळी …।। २ ।। सोन चाफ्याची
न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची
नसेल ती नार …।। २ ।।
अति नाजूक, तनु देखणी …।। २ ।।
गुणाची खणी, उभी नवखणी
चढून सुकुमार …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

जशी मन मथरती, धाकटी ।। २ ।।
सिंव्ह सम सिंहकटी, उभी एकटी
गळ्यामधी हार..।। २ ।।
अंगी तारुण्याचा बहर ।। २ ।। ज्वानीचा कहर,
मारितें लहर, मदन तलवार  ।। २ ।।
पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार ।। २ ।।
कोण सरदार हिचा भरतार ।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

नाकामध्ये बुलाख सुरती …।। २ ।।
चांदणी वरती, चमकती परती तिच्यापुढे फार
तिन्काप अंगीचा लाल
हीच पुढे नको तलवार
कवीराज चमकतो हिर …।। २ ।। लोकशाहीर
इतर शाहीर, काजवा वांग …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

चित्रपट : लोकशाहीर राम जोशी
गीत : शाहीर राम जोशी
संगीत : वसंत देसाई
गायक : जयराम शिलेदार

4 comments:

  1. खुपच छान ❣️

    ReplyDelete
  2. लट सुटले कुरळे बाल चालते गजाची चाल ......हा कडवं सुटले आहे

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना

    ReplyDelete
  4. स्पष्टीकरण हवं होतं कवितेचं
    कोणी स्पष्टीकरण देता का
    स्पष्टीकरण!

    ReplyDelete