Wednesday, 27 July 2016

तुझ्या रूपाचं चांदणं - ख्वाडा

तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं..
चांदणं पडलय.. न मला भिजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

हाळदिन माखली सूरी न हिथ ... घोड्यावरती  चढलो मी..
हाथात कट्यार, बाशिंग बांधून, मधाच्या पेवात पडलो मी...
माझ्या मनाच्या... माझ्या मनाच्या... माझ्या मनाच्या...
मातीत तिचंच बियाणं रुजू द्या..

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

तिला पाहता धावू लागला, लाजू लागला वारा हा.. ।। २ ।।
तिचा सरकता पदर.. सूर्याचा चढूलागला पारा हा...
आता नेमकेच... आता नेमकेच... आता नेमकेच...
सपान पडलंय न मला निजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं..
चांदणं पडलय.. न मला भिजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या..
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या..  ।। ३।।

--

बोल: विनायक पवार
संगीत: रोहित नागभिडे
गायक: आदर्श शिंदे 

6 comments:

  1. Awsssssssssssssssummmmmmm Bhau Adarshaa

    ReplyDelete
  2. आभारी आहोत.
    आसे पुर्ण गीत आसले की आमच्या सारख्याणा सोपे जाते .

    ReplyDelete
  3. 1 number lyrics, original thanks

    ReplyDelete
  4. आता नेमकेच सपान पडलयं........ भावा हृदयाला भिडलं.

    ReplyDelete