Sunday, 24 July 2016

मन उधाण वाऱ्याचे - अगं बाई आरेच्चा

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते... ।। २ ।।

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते ।। २ ।।

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।

आकाशी स्वप्नांच्या हरकून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच फिरते...
सावरते बावरते घर ते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर,
मनं हे वेडे झुलते,
मनं तरंग होऊन पाण्यावरती फिरते,
आणि शांत फिरुनी आभाळाला भिडते...

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।

रुणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते
कधी गहऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते,
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणाला मनं हे वेडे भुलते...
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते,
भाबडे तरीही भासांच्या मागून पडते...

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।


गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: अगं बाई आरेच्चा

No comments:

Post a Comment