विठ्ठल विठ्ठल ।। ४ ।।
तुला साद आली तुज्या लेकरांची,
अलंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी,
आम्हा वाळवंटी तुजी सावली,
गळा-भेट घेण्या भीमेची निघाली,
तुज्या नामघोषात इंद्रायणी..
विठ्ठल विठ्ठल ।। ४ ।।
हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल ।। ६ ।।
चाल तोरे तुजी वाट रात्रंदिनी,
घेतला पावलांनी वसा,
टाळ घोषातुनी साद येते तुजी,
दावते वैष्णवांना दिशा,
दाटला मेघ तू सावळा,
मस्तकी चंदना चा टिळा,
लेवुनी तुळशी माळा गळा या,
पाहसी वाट त्या राऊळा...
हा.. आज हरपलं देह भान,
जीव झाला खुळा बावळा,
पाहण्या गा तुज्या लोचनांत,
भाबड्या लेकरांचा लळा,
हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल ।। १२ ।।
जाहला गजर जाहलो अधीर,
लागली नजर कळसाला,
पंचप्राण हे तल्लीन,
आता पाहीन, पांडुरंगाला,
देखिला कळस.. डोईला तुळस..
धावितो चंद्रभागेसी
समीपही दिसे पंढरी,
याच मंदीरी माउली माझी,
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकल जगाचा त्राता,
घे कुशीत, या माउली तुज्या
पायरी ठेवतो माथा,
माउली माउली ।। ६ ।।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय ।।
गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: लई भारी
तुला साद आली तुज्या लेकरांची,
अलंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी,
आम्हा वाळवंटी तुजी सावली,
गळा-भेट घेण्या भीमेची निघाली,
तुज्या नामघोषात इंद्रायणी..
विठ्ठल विठ्ठल ।। ४ ।।
हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल ।। ६ ।।
चाल तोरे तुजी वाट रात्रंदिनी,
घेतला पावलांनी वसा,
टाळ घोषातुनी साद येते तुजी,
दावते वैष्णवांना दिशा,
दाटला मेघ तू सावळा,
मस्तकी चंदना चा टिळा,
लेवुनी तुळशी माळा गळा या,
पाहसी वाट त्या राऊळा...
हा.. आज हरपलं देह भान,
जीव झाला खुळा बावळा,
पाहण्या गा तुज्या लोचनांत,
भाबड्या लेकरांचा लळा,
हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल ।। १२ ।।
जाहला गजर जाहलो अधीर,
लागली नजर कळसाला,
पंचप्राण हे तल्लीन,
आता पाहीन, पांडुरंगाला,
देखिला कळस.. डोईला तुळस..
धावितो चंद्रभागेसी
समीपही दिसे पंढरी,
याच मंदीरी माउली माझी,
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकल जगाचा त्राता,
घे कुशीत, या माउली तुज्या
पायरी ठेवतो माथा,
माउली माउली ।। ६ ।।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय ।।
गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: लई भारी
खुप छान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete