Wednesday, 24 August 2016

सुंदरा मनामध्ये भरली - राम जोशी

सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली..
हवेलीत शिरली, मोत्याचा भांग…।। २ ।।
अरे गड्या, हौस नाही पुरली
म्हणोनि विरली, पुन्हा नाही फिरली
कुणाची सांग …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || धृ ||

जशी कळी …।। २ ।। सोन चाफ्याची
न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची
नसेल ती नार …।। २ ।।
अति नाजूक, तनु देखणी …।। २ ।।
गुणाची खणी, उभी नवखणी
चढून सुकुमार …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

जशी मन मथरती, धाकटी ।। २ ।।
सिंव्ह सम सिंहकटी, उभी एकटी
गळ्यामधी हार..।। २ ।।
अंगी तारुण्याचा बहर ।। २ ।। ज्वानीचा कहर,
मारितें लहर, मदन तलवार  ।। २ ।।
पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार ।। २ ।।
कोण सरदार हिचा भरतार ।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

नाकामध्ये बुलाख सुरती …।। २ ।।
चांदणी वरती, चमकती परती तिच्यापुढे फार
तिन्काप अंगीचा लाल
हीच पुढे नको तलवार
कवीराज चमकतो हिर …।। २ ।। लोकशाहीर
इतर शाहीर, काजवा वांग …।। २ ।।
नारी ग… ग ग ग ग ग जी || २ ||

चित्रपट : लोकशाहीर राम जोशी
गीत : शाहीर राम जोशी
संगीत : वसंत देसाई
गायक : जयराम शिलेदार

Wednesday, 27 July 2016

तुझ्या रूपाचं चांदणं - ख्वाडा

तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं..
चांदणं पडलय.. न मला भिजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

हाळदिन माखली सूरी न हिथ ... घोड्यावरती  चढलो मी..
हाथात कट्यार, बाशिंग बांधून, मधाच्या पेवात पडलो मी...
माझ्या मनाच्या... माझ्या मनाच्या... माझ्या मनाच्या...
मातीत तिचंच बियाणं रुजू द्या..

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

तिला पाहता धावू लागला, लाजू लागला वारा हा.. ।। २ ।।
तिचा सरकता पदर.. सूर्याचा चढूलागला पारा हा...
आता नेमकेच... आता नेमकेच... आता नेमकेच...
सपान पडलंय न मला निजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या.. ।। २ ।।
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या.. ।। २।।

तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं.. तुझ्या रूपाचं..
चांदणं पडलय.. न मला भिजू द्या...

माझं काळीज लागलंय नाचू.. न गाणं वाजू द्या..
गाणं वाजू द्या.. गाणं वाजू द्या..गाणं वाजू द्या..  ।। ३।।

--

बोल: विनायक पवार
संगीत: रोहित नागभिडे
गायक: आदर्श शिंदे 

Sunday, 24 July 2016

मन उधाण वाऱ्याचे - अगं बाई आरेच्चा

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते... ।। २ ।।

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते ।। २ ।।

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।

आकाशी स्वप्नांच्या हरकून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच फिरते...
सावरते बावरते घर ते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर,
मनं हे वेडे झुलते,
मनं तरंग होऊन पाण्यावरती फिरते,
आणि शांत फिरुनी आभाळाला भिडते...

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।

रुणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते
कधी गहऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते,
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणाला मनं हे वेडे भुलते...
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते,
भाबडे तरीही भासांच्या मागून पडते...

मनं उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

मनं उधाण वाऱ्याचे ।। २।।


गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: अगं बाई आरेच्चा

Wednesday, 20 July 2016

सैराट झालं जी - सैराट


अलगूज वाजं नभात,
भलतंच झालया आज.. 
अलगद आली मनात,
पहिलीच तरणी ही लाज

हो
अगं झणाणलं काळजामंदी,  
अन् हातामंदी हात आलं जी.. 

सैराट झालं जी ।। ३।।

बदलुन गेलया सारं,
पिरतीच सुटलया वारं... 
अल्लड भांबावल्याल,
बिल्लोरी पाखरू न्यार... 
आल मनातलं ह्या व्हटामंदी,
अन हातामंदी हात आल जी... 

सैराट झालं जी ।। ३।।

कवळ्या पानात ह्या,
सावळ्या उन्हात ह्या,  
बावळ्या मनात ह्या भरलं भरलं... 
तुझ गाणं मनामंदी,
घुमतय कानामंदी, 
सूर सनईचा राया सजल.. 

हो
सजलं... ऊन्ह-वार, नभ-तारं सजलं... 
रंगलं...  मन हळदीन राणी रंगल...
सरलं...  हे जगण्याचं झुरणं सरल...
भिनलं... नजरेन ईशचारी भिनलं... 
अगं धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी

सैराट झालं जी ।। ३।।

... आकरीत  घडलया,
सपान हे पडलंया,
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं... 
साता जन्माच नात...  रूजलया काळजात... 
तुला देवागत पुजल

हो
रूजलं... बीज पिरतीच सजणी रुजलं...
भिजलं... मनं पिरमान पुरत भिजलं...
सरलं... मनं  मारून जगण सरलं...
हरलं... ह्या पीरमाला समद हरलं... 
अगं कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी

सैराट झालं जी ।। ३।।

गायक: अजय गोगावले, चिन्मयी श्रीपाद
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट


Tuesday, 5 July 2016

माउली माउली - लई भारी

विठ्ठल विठ्ठल  ।। ४ ।।
तुला साद आली तुज्या लेकरांची,
अलंकापुरी आज भारावली,
वसा वारीचा घेतला पावलांनी,
आम्हा वाळवंटी तुजी सावली,
गळा-भेट घेण्या भीमेची निघाली,
तुज्या  नामघोषात इंद्रायणी..

विठ्ठल विठ्ठल  ।। ४ ।।

हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...

माउली माउली  ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली  ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल  ।। ६ ।।

चाल तोरे तुजी वाट रात्रंदिनी,
घेतला पावलांनी वसा,
टाळ घोषातुनी साद  येते तुजी,
दावते वैष्णवांना दिशा,
दाटला मेघ तू  सावळा,
मस्तकी चंदना चा टिळा,
लेवुनी तुळशी माळा गळा या,
पाहसी वाट त्या राऊळा...

हा.. आज हरपलं देह भान,
जीव झाला खुळा बावळा,
पाहण्या गा तुज्या लोचनांत,
भाबड्या लेकरांचा लळा,

हो… भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुजी आस का लागली,
जरी बाप साऱ्या जगाचा परी,
तू आम्हा लेकरांची विठू माउली...

माउली माउली  ।। ६ ।। रूप तुझे ।।
माउली माउली  ।। ६ ।। रूप तुझे ।।
विठ्ठल विठ्ठल  ।। १२ ।।

जाहला गजर जाहलो अधीर,
लागली नजर कळसाला,
पंचप्राण हे तल्लीन,
आता पाहीन, पांडुरंगाला,
देखिला कळस.. डोईला तुळस..
धावितो चंद्रभागेसी
समीपही दिसे पंढरी,
याच मंदीरी माउली माझी,

मुख दर्शन व्हावे आता,
तू सकल जगाचा त्राता,
घे कुशीत, या माउली तुज्या
पायरी ठेवतो माथा,

माउली माउली  ।। ६ ।।

पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय  ।।

गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: लई भारी

झिंग झिंग झिंगाट - सैराट

हे...
उरात होतय धडधड.. लाली गालावर आली..
अन अंगात भरलय वार.. हि पिरतीची बाधा झाली... ।।२।।
आता आधीर झालोया, मग बधीर झालोया..
अन तुझ्याच साठी बनून मजनू माग आलोया..
अन उडतंय बुंगाट.. पळतय चिंगाट, रंगात आलया...

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

आता उतावीळ झालो, गुडघा बाशिंग बांधल..
तुझ्या नावाच मी इनिशील, ट्याटून गोंदल..
हाथ भरून आलोया..  लई दुरून आलोया
अन करून दाढी, भारी परफ्युम मारून आलोया..
अग समद्या पोरात, म्या लई जोरात..
रंगात आलोया..

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

समद्या गावाला झालीया माझ्या लगनाची  घाई...
कधी व्हणार तू राणी माझ्या लेकराची आई..
आता तराट झालुया.. तुझ्या घरात आलुया....
लई फिरून बांधावरून, कल्टी मारून आलोया..
ढिन्चाक जोरात, टेक्नो वरात.. दारात आलोया...

झाल झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंगाट
झिंग झिंग.. झिंग झिंग.. झिंग ।।

गायक: अजय-अतुल
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: सैराट

तुझ्या पिरतीचा हा इंचू - फँड्री

जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं…
पुरं दिसभर तुझ्या, फिरतो मागं-मागणं… ।। २ ।।

जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला…

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला… ।। २ ।।
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकड पाहीना…

हे.. भिर भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं…
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं…  ।। २ ।।

नजरत मावतीया, तरी दूर धावतीया…
मनीचा ठाव तुझ्या मिळणा…

आता कोनामुळं घास तरी गीळणां…
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं…
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां…

सांधी कोप-यात उभा एकला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार नाही…
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला दार नाही…   ।। २ ।।

हे राख झाली जगण्याची, हाय तरी जिता,
भोळं प्रेम माझं, अन भाबडी कथा…
बघ, जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला…

तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…  ।। २ ।।
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…

हे... खरकाट्या ताटावर, रेघोट्याची झालर..
हातावर पोट, बिदागीची  झुणका भाकर.. ।। २ ।।

उन्हा-ताणात भुका, घसा पडलाय सुखा...
डोळ्यातलं पाणी तरी घळना...

आता कोनामुळं घास तरी गीळणां…
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं…
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां…


गायक: अजय गोगावले
संगीत: अजय-अतुल
चित्रपट: फॅन्ड्री